पांझरा नदीवर झुलता पुल उभारणीस शासनाची मंजूरी

0

धुळे । शहरातील मध्यभागातून वाहणार्‍या पांझरा नदीवर झुलता पुल उभारणीस राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी देण्याबद्दल जिल्हाधिकारांना आदेश दिले आहेत. तब्बल 8 वर्षांनी या झुलत्या पुलाच्या कामाला मान्यता मिळाली असून देशभरात नाही असे उत्कृष्ट स्थळ धुळे शहरात येत्या सहा ते आठ महिन्यात प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती आ. अनिल गोटे यांनी आज पत्रकाव्दारे दिली आहे.

अविकसितपणाचा शिक्का लागलेल्या धुळे शहराचे रुप हळुहळू पालटत आहे. आजही पांझरा नदीची अवस्था पाहता धुळे शहरातील घाण पाणी वाहण्याचा एक प्रवाह एवढ्या पुरतेच मर्यादीत आहे. धुळेकरांच्या दुर्दैवाने अनेक नतभ्रष्ट या शहरात आहेत की ज्यांना शहर असेच अविकसित, घाणेरडे, अस्वच्छ व अतिक्रमणाने व्याप्त झालेल्या रस्त्यांमधून सामान्य नागरीकांना पायी सुध्दा चालता येता कामा नये, अशी भावना राष्ट्रवादी सेनेच्या नेत्यांची आहे. यातूनच चौपाटी उध्वस्त करणे, पांझरेच्या दोन्ही काठावरच्या अत्यंत वेगाने सुरू असलेल्या त्येकी साडेपाच किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामाला मनाई हुकुम मिळावा यासाठी नगरसेवक नरेंद्र परदेशी जीवाचा आटापिटा करीत आहे. एवढ्या अडथळ्यानंतर आणि खेकड्यांची शर्यत पार करुन अखेरीस शहरातील माता भगिनींसह बाळगोपाळ, थकल्या ागलेल्या गरीब श्रीमंत सर्व जाती धर्माच्या नागरीकांना त्यांच्या हक्काचे एक स्थान झुलता पुलास मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करुन घेतला.

आदेश प्राप्त झाल्याची माहिती
शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीच्या दोन्ही काठावरुन जाणारे साडे पाच साडेपाच किलोमिटरच्या रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. तसेच जुने धुळ्याकडून पारोळा रोडला जोडणार्‍या ब्रिजकम बंधार्‍याचेही काम मार्गी लागले असतांनाच आता शहरातील मध्यवर्ती अशा गणपती मंदिर पुलाजवळ झुलता पुल बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती आ.अनिल गोटे यांनी दिली आहे.