मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हार्दिक पांड्याने केलेल्या विधानानंतर त्याच्यावर बरीच टीका होत आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य पांड्याने या कार्यक्रमात केले होते. यानंतर त्याने काल जाहीर माफी मागितली. या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीलाही पांड्याने उत्तर देत माफी मागितली. मात्र, माफी पुरेशी नाही, तर पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर बंदी घालण्याची मागणी माजी महिला क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी केली आहे.
संबंधित बातमी-नेटीझंन्सच्या टीकेनंतर अखेर हार्दिक पांड्याने मागितली माफी !
‘क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नाते काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचे प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारचे विधान हे खपवून घेण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही ७० च्या दशकात असे विधान केले होते आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,” असे एडुल्जीने सांगितले आहे.