कर्जत । कर्जत तालुक्यातून अनेक गावांमधून गेल्या वर्षभरापासून रिलायन्स पाईपलाईन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या दोन्ही पाईपलाईन संदर्भात त्या-त्या व्यवस्थापनाने अन्यायच केल्याचे चित्र आहे. त्यासाठी कंपनीने शेतकर्यांना घाबरविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून वेळप्रसंगी शेतकर्यांवर गुन्हेही दाखल केले. तसाच, प्रकार काळ आंबोटमध्ये घडला. कंपनीने कोणत्याही शेतकर्याला विचारात न घेता परस्पर आपल्या लवाजमा आणि पोलिस बळ घेऊन आंबोटमध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी दाखल झाले. परंतु, ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी एकजूटी आणि समयसूचकता दाखवत आपल्या गावातील पाईपलाईन बाधित शेतकर्यांवर अन्याय होणार नाही यासाठी एकत्र येऊन कंपनीचे पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करुन प्रथम आमचा योग्य मोबदला आम्हाला द्या आणि मगच काम सुरु करा असे शेतकर्यांनी कंपनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले. या संदर्भात आंबोट येथील शेतकरी यांनी आपली बाजू मांडताना कंपनी व्यवस्थापक शेतकर्यांची कशाप्रकारे दिशाभूल करते तसेच या कंपनीचा शेतकर्यांविरुद्ध सुरु असलेला मुजोरपणा कधिही खपवून घेतला जाणार नाही असे ग्रामस्थांनी आणि शेतकर्यांनी कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
आंबोट येथील शेतकर्यावर कंपनीकडून झालेल्या अन्यायासंदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात शेतकर्यांची बाजू मांडताना माजी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, भरत भगत, राजेश जाधव, बाबु घारे, बाजीराव दळवी, योगेश दाभाडे यांसह ग्रामस्थ कृष्णा जोशी तसेच लक्ष्मण धर्मा गायकवाड, देहू रामभाऊ मसणे, सुधाकर तुळशीराम मसणे, पांडूरंग आंबो सोनावले, शिवाजी सावळाराम मसणे, शांताराम गणपत मसणे, श्रीराम धाऊ जोशी, काळुराम पांडुरंग मसणे, शांताराम लक्ष्मन मसणे, सदाशिव कामळू मसणे, गजानन शंकर मसणे, पंढरीनाथ बंडू मसणे, सुभान भाऊ मसणे, सरदार भागाजी मसणे, वामन बळीराम मसणे, भगवान रामचंद्र मसणे, संजय देहू मसणे, प्रदीप चंद्रकांत मसणे, हरिचंद्र मोतीराम मसणे, लिंबाजी भिमाजी मसणे, सदाशिव पांडुरंग मसणे, दीपक हिरामण मसणे हे सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एच.पी.सी.एल. या कंपनीकडून आंबोट येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी शेतकर्यांची बाजू समजून घेऊन त्यांना अपेक्षित असणारा योग्य तो न्याय कंपनीकडून देण्यात यावा नंतरच काम सुरू करावे.
– सुजाता तानवडे,
निरीक्षक -कर्जत पोलीस ठाणे