पाईप चोरी करणार्‍यांना अटक

0

जामनेर । तालूक्यातील गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्टीज कंपनीतुन मे महीन्यात बेंगलोर येथे माल पोहचविण्यासाठी निघालेला ट्रक तिथे न पोहचता गहाळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर गहाळ झालेले पाईप हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात जामनेर पोलीसांना यश आले आहे.

1 मे रोजी चालक शेख शकीब, नुर मोहम्मद (रा.भोकरदन जि.जालना) हा त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीच्या ट्रकमधे साडेसहा लाख रुपये किमतीचे 1 हजार 250 नग पि.व्ही.सी. पाईप भरून बेंगलोर येथे पोहचविण्यासाठी निघाला होता. परंतु तो तेथे पोहचला नसल्यामुळे सदर कंपनी त्याची व गाडीची शोधाशोध केली असता तो कुठेही आढळून न आल्यामुळे शेवटी 22 मे रोजी जामनेर पोलीस स्टेशनमधे त्याच्या विरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखला करण्यात आला होता. तेव्हापासून जामनेर पोलीस संबधीत चालकाच्या शोधात होते. सुमारे अडीच महिन्यानंतर मिळालेल्या गुप्त माहीतीवरून चालक शेख शकीब, नुर मोहम्मद यास पोलीसांनी ताब्यात घेतले. चालकांनी अस्लम बेग मिर्झा (सिल्लोड) याला विकल्याचे कबुल केले. त्याच्याकडून 800 पाईप हस्तगत करण्यात आले पुढील तपास पो.नि.नजीर शेख यांच्या मार्गदर्शना खाली पो.उ.नि.सुनिल कदम हे करीत आहे.