!!पाऊले चालती पंढरीची वाट!!

0

शिंदखेडा । शिंदखेडा बसस्थानक येथुन पंढरपुर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणार्‍या श्री विठ्ठल रुखमाई यांच्या महोत्सवासाठी शिंदखेडा शहरातील वारकरी मंडळी स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्पेशल पंढरपुर बस सोडण्यात आली.त्यावेळी शिंदखेडा शहराचे अनिल वानखेडे(गटनेते) यांनी एस.टी.मधिल सर्व वारकरी मंडळी यांना गुलाब पुष्प,चहा व बिस्किट वाटप करून सर्वांना आपली वारी ही सुखरूप व आनंददायी होवो अशा शुभेच्छा दिल्या. अशोक देसले(माजी उपनगराध्यक्ष),प्रविण माळी(अध्यक्ष माळी समाज),निलेश पाटिल ,स्वप्नील मोरे,तालुकाध्यक्ष अहिर सुवर्णकार नवयुवक संघटना आदी उपस्थित होते.