नाशिक । पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने मुंबई-कराची विमानसेवा येत्या 11 मे पासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही पाकिस्तानची राष्ट्रीय विमान सेवा असून आठवड्यातून एकदा कराची-मुंबई विमान सुरु आहे. दर मंगळवारी ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता ती स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान एअरलाइन्सने घेतला आहे.
उपग्रहाच्या कक्षेतून वगळल्याचे कारण
यासंदर्भात निर्णय जाहीर झाल्यापासून दोन्ही देशांतल्या समाजमाध्यमात बरीच चर्चा होत आहे. एक तर्क असा आहे की, उभय देशांतील तणावामुळे आणि व्हिसा प्रक्रिया किचकट असल्याने प्रवासी संख्या कमी असेल आणि ही विमानसेवा परवडत नसेल. भारतानें दक्षिण आशियाई देशांसाठी प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या कक्षेतून पाकिस्तानला वगळल्याने पाकिस्तान सरकारसह तेथील व्यवस्था दुखावल्या असू शकतात. भारताला प्रत्यूत्तर म्हणून अशातर्हेची पावलं उचलली जात असावीत. भारताकडून एअर इंडियाची पाकिस्तानसाठीची विमानसेवा स्थगित आहेच.
कराची, लाहोरहून दिल्लीची विमाने सुरुच
ही विमानसेवा अचानक स्थगित करण्याचे कारण कळू शकलें नाही. मात्र या विमान कंपनीचे म्हणणे आहे की, पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने ही सेवा सुुरू ठेवणे व्यवस्थापनाला आर्थिकदृट्या सोयीचे नाही. मात्र तेच एकमेव कारण नसावे असे दिसते. यामागे भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणावही कारणीभूत आहेच. असे असले तरी सध्या कराची आणि लाहोरहून दिल्लीसाठी असलेली विमानसेवा मात्र पीआयएने
सुरुच ठेवलेली आहे.