पाकच्या गोळीबारात जवान शहीद

0

श्रीनगर । सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून बुधवारी दुपारी पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. आर. पी. हाजरा असे या जवानाचे नाव असून ते हेड कॉन्स्टेबलपदावर कार्यरत होते.

जम्मू- काश्मीरमधील सीमा रेषेवर सांबा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याच्या गोळीबारात सीमेवर तैनात असलेले बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर पी हाजरा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.