पाकच्या मुसक्या आवळल्या, 255 दशलक्ष डॉलर्सची मदत रोखली

0

वॉशिंग्टन : पाकिस्तानला कालच खडसावल्यानंतर मंगळवारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक सैन्य मदत रोखली. जवळपास 255 दशलक्ष डॉलर्सचा मदत प्रस्ताव अमेरिकेने नाकारल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे कूटनैतिक पातळीवर ही घटना मोठा विजय मानली जात आहे. पाकिस्तानवर ही सर्वात मोठी कारवाई अमेरिकेने करत पाकिस्तानला रोखठोक शब्दांत इशारा दिलेला आहे.

पाकिस्तानला मदत हा मूर्खपणा : ट्रम्प
व्हाईट हाऊसने केलेल्या निवेदनात नमूद आहे, की पाकिस्तानी भूमिवरून दहशतवादाविरुद्धचा लढा किती क्षमतेने लढविला जातो, याची प्रत्यक्ष तपासणी करूनच यापुढे पाकिस्तानला मदत द्यायची किंवा नाही, याचा निर्णय अमेरिका सरकार घेईल. आर्थिक वर्ष 2016 पोटी अमेरिका पाकिस्तानला 255 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत देणार होती. तसा पाकिस्तानचा प्रस्तावही त्यांनी मंजूर केला होता. परंतु, भारताच्या तक्रारीनंतर ट्रम्प प्रशासनाने तातडीने ही मदत रोखण्याची कारवाई केली. अमेरिकेने दक्षिण आशिया रणनीतीतही महत्वपूर्ण बदल केले असून, आता भारताचा सल्ला अमेरिका महत्वाचा मानत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान हा कपटी असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानला 15 वर्षांत 33 अब्ज डॉलर्सची मदत करून आम्ही मूर्खपणा केला आहे, अशी खंतही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.