पाकला तोंडी लावत कोहली, धोनी जेवले!

0

मुंबई। भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याचे कर्णधार विराट कोहली याच्या मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.भारतीय संघ इंग्लंड येथे मुक्काम आहे.या मुक्कामात आजी माजी कर्णधार हे कोठेही एकत्रित दिसत आहे. भारतीय संघ जेवणाला गेला असता त्याठिकाणीही ते दोघे एकत्रित होते.जेवणाच्या टेबलावर त्यांनी जेवणाचा आनंद घेत पाकिस्तान बरोबर होणार्‍या सामन्याच्या रणनितीवर चर्चा केल्याचे समजते.

चॅम्पियन ट्रॉफीत बर्‍याच कालावधीनंतर भारत व पाकिस्तान यांचा सामना रंगणार आहे.हा सामना संपुर्ण जगात असलेले दोन्ही देशाचे समथर्क पाहणार आहे.त्यामुळे एक से भले दो आणि एक और एक ग्यारह अशी हिंदीत वचने आहेत.यामुळेच विद्यामान कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानी पाक विरूध्दचा सामना तोंडावर आलेला असतांना बर्मिंगहॅममध्येही ते दोघे टीम इंडियाच्या मोजक्या शिलेदारांना घेऊन डिनर गेले होते. विराट आणि धोनीच्या साथीने भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि केदार जाधव या डिनर प्लॅनमध्ये सहभागी झाले होते. बुल रिंग परिसरातल्या रेड हॉट या चायनीज रेस्टॉरंटमध्ये ही मंडळी गेली होती. तिथल्या डिनर टेबलवर विराट, धोनी आणि त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी खाण्याच्या गप्पांपेक्षा सिक्रेट रणनीतीची आखणीच केल्याचे समजते. हा सामना दोन्ही देशासाठी अंतिम सामन्यापेक्षाही मोठा असणार आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीला तणाव असतांना कसे विजयापर्यंत पोहचावे याची चांगली जाण आहे.तसे त्याने आपल्या खेळातून सिध्द केले आहे.त्यामुळे विराट सध्या माही बरोबर चॅम्पियन ट्रॉफित पाकचा धुव्वा उडविण्यासाठी रणनिती आखतांना दिसत आहे.