पाकला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती ; अतिरेकी अड्ड्यांचे स्थान बदलले !

0

नवी दिल्ली-उरी हल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. आता पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतावाद्याविरोधात भारत कडक कारवाई करणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची चांगलीच धास्ती लागली आहे. सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीमारेषेच्या दोन्ही बाजूला सध्या तणावाचे वातावरण आहे.

पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिल्यानंर लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताची तयारी पाहून पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे तर जगभरात याचा निषेध केला जात आहे.