पाकव्याप्त काश्मीर भारताचाच! पीटीव्हीने दाखवला नकाशा

0

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही चॅनल पीटीव्हीने पाकिस्तानची लोकसंख्या दाखवताना संपूर्ण काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानने पीओकेचा एक विवादित नकाशा प्रसिद्ध केला, जो कोरोना विषाणूसाठी बनविलेल्या वेबसाइटच्या माध्यमातून भारतात दिसत होता. पाकमधल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या त्वरित हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इम्रान सरकारला धारेवर धरले. नकाशात पाकव्याप्त काश्मीरमधला भारताचा तो भाग दर्शविला आहे, ज्याचा दावा भारत आधीपासूनच करत आला आहे.
यानंतर लोकांनी ट्विटर व अन्य माध्यमांवर पीटीव्हीच्या वृत्तावरून इम्रान सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता पीटीव्हीने स्पष्टीकरण दिले आहे की, ही मानवी चूक होती आणि दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. पीटीव्हीने निवेदन जारी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे, पीटीव्ही व्यवस्थापनाने मानवी चुकांमुळे पाकिस्तानचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. त्यासंदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही पीटीव्हीच्या एमडीने दिले आहे.