वॉशिंग्टंन। पाकिस्तानवर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप करत त्यांना दहशतवादी राष्ट्र घोषीत करण्याची मागणी अमेरिकेच्या दोघा वरिष्ठ खासदारांनी संसदेत केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना पाकिस्तानला देण्यात येणार्या सैनिकी मदतीमध्ये कपात करण्याचे आवाहन करताना या खासदारांनी सांगितले की, पाकिस्तानला अमेरिकडून सहजासहजी शस्त्रात्रे मिळणार नाहीत अशी व्यवस्था करायला पाहिजे. डोना रोहराबाचेर आणि टेड पो ने या दोन खासदारांनी अमेरिकेच्या संसंदेत हे आरोप केले. अमेरिकेतील संसदेच्या दहशतवादाशी संबधीत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपसमितीच्या बैठकित रोहराबाचेर म्हणाल्या की पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांमध्ये समावेश आहे हे माहित आहे. आपण दिलेल्या शस्त्रांच्या मदतीने ते आपल्याच माणसांना मारतील त्यामुळे त्यांना शस्त्रात्रे देऊ नयेत. खासदार टेड पो ने म्हणाले की, पाकिस्तान अमेरिकेशी प्रामाणीक आहे का? किंवा ते मदत मिळवण्यासाठी अमेरिकेशी
लंपडाव खेळत आहेत याची चौकशी करावी.
डॉ. आफ्रिदींना शोधा
पाकिस्तानवरील आरोपांचा पाढा वाचताना रोहराबाचेर यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला डॉ. आफ्रिदी यांना शोधून काढण्याची विनंती केली. रोहराबाचेर म्हणाल्या की, पाकिस्तानने आता काय केले आहे हे तुम्हाला माहित असेलच. त्यांनी डॉ. आफ्रिदी यांना एका गोपनीय स्थळी तळघरात डांबून ठेवले आहे. प्रशासनाने त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांची मुक्तता करावी. डॉ. आफ्रिदी यांनी तालिबान दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अमेरिकेला मोठी मदत केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर अमेरिकेच्या कमांडोंनी कारवाई करत लादेनचा खात्मा केला होता.
इजिप्तला मदत करा
संसदेसमोर बोलताना डोना रोहराबाचेर म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थीती दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी इजिप्तला मदतीची आवश्यकता आहे. कोणाकडून फारशी मदत नसताना इजिप्तने दहशतवादाविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्यांना शस्त्रात्रांची मदत केल्यास ते किमान अमेरिकेच्या नागरिकांविरुद्ध त्याचा वापर करणार नाहीत.
अमेरिकेची शस्त्रात्रे तालिबानला अमेरिकेकडून मिळत असलेली शस्त्रात्रे पाकिस्तान अफगणीस्तानात कार्यरत असलेल्या तालिबानाला विकत असल्याचा आरोप या खासदारांनी केला. या शस्त्रांत्राच्या मदतीने तालिबानी दहशतवादी अमेरिकेच्या सैन्यावर हल्ले करतात, त्यामुळे एकप्रकारे पाकिस्तान अमेरिकेचे नुकसान करत आहे. असे या खासदारांनी सांगितले. पाकिस्तान हक्कानी नेटवर्कला मदत करते. त्यामुळे अमेरिकेने तालिबानशी चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानला भाग पाडावे. पाकिस्तानच्या दुहेरी भूमिकेबाबत या दोन्ही खासदारांनी संसदेत चिंता व्यक्त केली. पाकिस्तान नेहमीच भारतातही दहशतवादी कारवाया घडवत असते. या कारवायांमध्ये अनेकदा परदेशी शस्त्रात्रे भारतीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली आहे.