भोपाळ- पाकिस्तान-बांगलादेशची आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. पाक आणि बांगलादेशच्या सीमेवरून दहशतवादी देशात घुसखोरी करतात. दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लवकरच सील करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील टेकनपूर बीएसएफ अकादमीत राजनाथ सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह यांनी शनिवारी टेकनपूर येथील बीएसएफ अकादमीत पासिंग आउट परेडमध्ये सहभाग घेतला. राजनाथ सिंह म्हणाले की, बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेसंदर्भात आपली रणनीती बदलली आहे. दहशतवादी कारवाया आणि शरणार्थींना लगाम लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, भारत-पाक बॉर्डर डिसेंबर 2018 पर्यंत सील करण्यात येणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते.