पाकिस्तान मधील ‘चहावाला’ कोट्यधीश

0

पेशावर- नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान मधील सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रिय झालेले ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) चाहावाला म्हणून प्रसिद्धी असलेली कोटयवधी संपत्तीचे मालक विजयी झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणाचा हवाला देत एका खाजगी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानात २५ जुलैला पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी खान नागरिकांना चाय देतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. हे काम करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ मतदानाच्या नंतरही चित्रीत करण्यात आल्याचे बोलले जाते. खान यांनीही आपण निवडणूक जिंकलो असलो, तरी आपले मूळ काम व्यवसाय चाय बनवणे हेच असल्याचे म्हटले आहे. या विजयानंतर शिक्षणसुविधावर तसेच पायाभूत सोयीसुविधवार आपला सर्वाधिक भर राहील, असेही त्यांनी गुल जफर खान असे या उमेदवाराचे नाव असून, ते खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एनए ४१ (बाजौर) येथून निवडून आले आहेत. त्यांनी विवरणपत्रात आपल्याकडे तीन कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. विवरणपत्रातील तपशिलानुसार खान यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. याशिवाय त्यांच्याकडे एक कोटींची अचल मालमत्ता, दोन घरे आणि एक कोटी २० लाख रुपये किमतीची शेतजमीन आहे. इम्रान खान यांच्या पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी ते रावळपिंडीच्या एका हॉटेलमध्ये चाय बनवण्याचे काम करत होते, अशी चर्चा होती सर्व स्तरातून होत आहे .