लाहोर । वेस्ट इंडिजचा 36 वर्षीय क्रिकेटर सॅम्युअल्स पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएल खेळ्यासाठी आहे. त्याने पाकिस्तानी सैन्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. सॅम्युअल्स पीएसएलमध्ये मार्लन सॅम्युअल्स पेशावर जाल्मी संघाचे प्रतिनिधत्व करतो.अंतिम सामना खेळण्यासाठी लाहोर आला असतांना जाल्मी संघाने विजेतेपद पटकावले आहे.संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केल आहे. त्यामुळे मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे तोडभरून कौतून केले आहे.जाल्मी संघाने विजेतेपद पटकविल्यानंतर पाकिस्तानीचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी विजेत्या संघाची भेट घेतली होती.
पाकिस्तान लष्करप्रमुखांशी भेट झाल्यानंतर सम्युअल्सने आपली प्रतिक्रिया दिली होती.पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. इथे जे लोक मागील काही काळापासून क्रिकेट पाहू शकत नव्हते, त्यांच्या उदार चेहर्यावर या सामन्यामुळे आनंद पाहायला मिळाला. मी मनाने, हृदयाने पाकिस्तानी आहे. यामुळे पाकिस्तानात येण्याबाबत निर्णय घेण्यास फार वेळ लागला नाही.पाकिस्तानी लष्करप्रमुखांना संबोधित करताना सॅम्युअल्स म्हणाला की, जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी प्रतीक्षा करत आहे. मला पाकिस्तानी सैन्याचा एक भाग बनायचा आहे. मी मरेपर्यंत या देशात येणार.