बर्मिंगहॅम । आसीसी चॅम्पियन ट्रॉफिच्या पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या.त्याचवेळी युवराज सिंग याने पाकिस्तानी गोलंदाजीची केलेली धुलाईमुळे भारतीय संघाला मोठी धाव संख्या उभारण्यास मदत झाली. त्याच्या धडकोबाज फलंदाजीने मी भारावून गेला आहे.’युवराज सिंगचा तो धडाका पाहून मी क्लब क्रिकेटर आहे की काय असेच मला त्यावेळी वाटत होते,’ अशी प्रांजळ कबुली विराटने दिली असून क्षेत्ररक्षणात अजुन काही सुधारणा कराव्या लागती.
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफिमध्ये भारत-पाक सामन्याकडे सर्व जगाचे डोळे लागले होते. या सामन्यात पाकला 124 धावांच्या फरकाने भारताने धुळचारून पहिला विजय साजरा केला.कर्क रोगावर मात केल्यानंतर भारताच्या संघात पुनरागमन करणारा युवराज सिंहने 32 धावांत ठोकलेल्या 53 धावा करित तो या सामन्याचा सामनावीर ठरला त्याचा या सामन्यात सिंहाचा वाटा होता. युवीच्या खेळाचे विराटने तोंडभरून कौतुक केले. ’माझ्या बॅटमधून काल फारशा धावत निघत नव्हत्या. मी चाचपडत असताना युवराजने सगळी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. युवराजची फटकेबाजी बघून मी हैराण झालो. मी क्लब क्रिकेटर असल्यासारखं मला त्यावेळी वाटत होते,’ असे विराट म्हणाला.
क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल!
युवराज पकड्या बरोबर कायमच असाच खेळतो अंगात संचारते त्याच्या ह्या मागे पण सचिन देवच आहे 2003 च्या वर्ल्ड कप मधे डोस दिला होता तो अजून पुरतोय त्याला ’भारतीय संघाची गोलंदाजी व फलंदाजी समाधानकारक झाली. दोन्ही आघाड्यांवर आमच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. संघाची गोलंदाजी व फलंदाजीला मी दहापैकी 9 गुण देईन. पण क्षेत्ररक्षणाला फक्त 6 देईन. क्षेत्ररक्षणामध्ये आम्हाला आणखी बरीच सुधारणा करावी लागेल. त्या दिशेने काम करावे लागेल,’ असेही त्याने सांगितले.