नवी दिल्ली : पाक सेना हीच तिली खरी सत्ता असून तिच्यामागूनच पाकच्या नागरी सत्तेला फ़रफ़टावे लागत असल्याने यापुढे भारतातही दुहेरी डावपेच खेळण्याचा विचार सुरू झाला असल्याचे कळते. त्यानुसार एका बाजूला पाकसेनेला सीमेलगत चोख प्रत्युत्तर द्यायचे आणि पाक मुत्सद्दी राजकारण्यांची गोडीगुलाबी दाखवायची, असा खेळ केला जाऊ शकेल. पाकिस्तान नेहमी अशीच रणनिती योजून वागत आला आहे. तसेच आता भारतानेही वागायचे ठरते आहे. त्यानुसार पाकसीमा व अतिरेकी हल्ल्याच्या बाबतीत भारतीय सेनेला वेळोवेळी गरजेनुसार थेट कृती करण्याची मुभा दिली जाईल आणि भारतीय मुत्सद्दी शांततेची व वाटाघाटींची जपमाळ ओढत बसतील.
आजपर्यंत स्थानिक पातळीवर हल्ले वा अतिक्रमण झाल्यास स्थानिक सेनाधिकारी पाकला उत्तर देण्यास अधिकृत होते. पण समोरून हल्ला वा अतिक्रमण होण्याची शक्यता दिसल्यास त्यांना सरकारला कळवून गप्प बसावे लागत होते. आता त्यातून भारतीय लष्कराला स्वातंत्र्य देण्यात येणार येईल. हल्ल्याची वा घुसखोरीची नुसती शक्यता दिसली, तरी त्यात हस्तक्षेप करून कठोर कारवाईचे निर्णय गरजेनुसार घेण्याचे अधिकार त्यांना दिले जातील. मात्र अशा कुठल्याही घुसून केलेल्या हल्ले वा उत्तराची जबाबदारी भारत सरकार घेणार नाही. किंवा त्याला दुजोराही दिला जाणार नाही.
जेणे करून सीमेवरील पाक सेनेला सतत गुंतवून ठेवायचे आणि त्यांच्याकडून अतिरेकी जिहादींना मिळणार्या संरक्षणात बाधा आणायची, असा दुहेरी डाव भारतही यापुढे खेळणार आहे. तसे झाल्यास व्याप्त काश्मिरातील पन्नासहून अधिक अतिरेकी छावण्यांना संरक्षण व मदत करताना पाक सेनेची तारांबळ उडून जाईल व त्यांना भारतीय हद्दीतले हल्ले कमी करावे लागतील, अशी अपेक्षा