जळगाव। बांभोरी येथील तरूण फिरायना जातो सांगून 29 एप्रिलपासून घरातून बाहेर निघाला होता. मात्र, घरीच परतला नसल्याने कुटूंबियांनी पाळधी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. परंतू त्या तरूणाचा आज बुधवारी सायंकाळी हरविल्याच्या पाचव्या दिवशी निमखेडी परिसरात अखेर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना घडली असून त्या तरूणाची कपड्यांवरून ओळख पटली असून पवन अनिल सपकाळे (वय-19) असे मयत तरूणाचे नाव आहे.
घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पवन हा बांभोरी येथील रहिवासी असून आई सोबत राहतो. तर हातमजूरीचे काम करतो. दरम्यान, आखाजीच्या दुसर्या दिवशी 29 एप्रिलला पवन हा निमखेडी गावात फिरायला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर निघाला होता. त्यानंतर पवन हा घरीच परतला नसल्याने कुटूंबियांनी पाळधी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. आज बुधवारी निमखेडी परिसरातील दर्ग्याच्या मागील बाजूच्या एका प्लॉटमध्ये नागरिकांना तरूणाचा कुजलेला मृतदेह मिळून आल्यानंतर त्यांनी लागलीच तालुका पोलिसांना याबाबत कळविले.पवन याच्या नातेवाईकांनाही या विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही त्या ठिकाणी गेल्यानंतर मृतदेह बघितला. यावेळी कपड्यावरून मृतदेह पवन याचाच असल्याचे निषन्न झाले. रात्री मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, पवन याचा घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी वर्तविला आहे. दरम्यान, पवन याचा मोबाईल व पगाराचे पैस्े त्याच्याजवळून मिळून आलेले नाही.