पाचोरा । कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी पंचायत समिती सदस्या अनिता कैलास चौधरी यांची निवड करण्यात आली. पं.स.सभापती सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसभापती अनिता पवार, बीडीओ गणेश चौधरी, सदस्य बन्सी पाटील, ललिता वाघ, रत्नप्रभा पाटील, वसंत गायकवाड, ज्ञानेश्वर सोनार, रेखा पाटील, मंगला पवार आदी उपस्थित होते. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, विजया पाटील, अमोल शिंदे, गणेश गोसावी, सदाशिव पाटील, शरद सोनार नंदु सोमवंशी आदींनी अभिनंदन केले.