पाचोरा। शहरातल गो.से. हायस्कुल मध्ये 14-19 वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक एस.डी.पाटील यांचेहस्ते झाले. 19 वर्षाखालील गटात एम.एम.कॉलेज, नगरदेवळा येथील पवार महाविद्यालय, पाचोरा येथील तावरे ज्युनिअर महाविद्यालयात, निर्मल इंटरनॅशनल स्कुल, शिंदे इंटरनॅशनल स्कुल, पिंपळगांव ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला. तर 4 वर्षाखालील गटात गो से हायस्कुल, बुर्हानी इंग्लिश मेडिअम स्कुल, निर्मल इंटरनॅशनल स्कुल, शिंदे इंटरनॅशनल स्कुल, पी.के. शिंदे हायस्कुल, आदर्श स्कुल, शारदा इंग्लिश स्कुल, वर्ल्ड इंटरनॅशनल स्कुल, जय किरण प्रभाजी स्कुल, गुरुकुल विद्यालय, नवजीवन विद्यालय या शाळांनी सहभाग नोंदविला.
बुद्धीबळ स्पर्धेत विजयी संघाचे खेळाडू
19 वर्षाखालील मुलांचा विजयी संघ- रोहित चौधरी (एम.एम. कॉलेज), सतीश गढरी (एस के पवार कॉलेज,नगरदेवळा), अजय महाजन (एस के पवार कॉलेज ,नगरदेवळा), पंडित महाजन (एस के पवार कॉलेज,नगरदेवळा), लक्ष्मण महाजन (एस के पवार कॉलेज, नगरदेवळा) मुलींमध्ये आकांक्षा कौंडिण्य (एम.एम.कॉलेज ,पाचोरा), पायल बाफना (एम एम कॉलेज,पाचोरा), अपूर्वा पाटील- (एम एम कॉलेज,पाचोरा), हेमलता पवार तावरे (ज्युनिअर कॉलेज ,पाचोरा), सिद्धी संघवी (निर्मल इंटरनॅशनल स्कुल,पाचोरा)
14 वर्षाखालील मुलांचा विजयी संघ- श्रेयस दाभाडे (बुर्हानी इंग्लिश मेडिअम स्कुल पाचोरा), अर्चिक पाटील (निर्मल इंटरनॅशनल स्कुल, पाचोरा), अथर्व येवले (बुर्हानी इंग्लिश मेडिअम स्कुल पाचोरा), वृषांक अहिरे (निर्मल इंटरनॅशनल स्कुल,पाचोरा), विजिगिशु पाटील (निर्मल इंटरनॅशनल स्कुल, पाचोरा) मुलींचा संघ- कल्याणी चव्हाण (पी.के.शिंदे हायस्कुल पाचोरा), स्मिता वाघ (पी.के.शिंदे हायस्कुल पाचोरा), निकिता पाटील (शिंदे हायस्कुल पाचोरा), अस्मिता खांडेकर (शिंदे हायस्कुल पाचोरा), रिद्धी संघवी(निर्मल इंटरनॅशनल स्कुल,पाचोरा) यांचा
समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पी.जे.पाटील,ए.जे.महाजन, पी.पी.पाटील, पी.एम.वाघ, आर.एल.पाटील, सुधीर पाटील, एन.आर.ठाकरे, ए.बी.अहिरे, पी.एन.नागणे, प्रा. गिरिष पाटील, सुशांत जाधव, आर.एन.सपकाळे, आर.बी.तडवी, गजानन सोमवंशी, एस.पी.करंदे, जावेद शेख, सुनील मोरे, नंदू कुळकर्णी, जी.के.वानखेडे, सुर्यकांत देवराज, ज्ञानेश्वर देवरे, डी.आर.पाटील, प्रशांत शिरुडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.आर.ठाकरे यांनी केले तर आभार ए.जे.महाजन यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अभिषेक जाधव, मेहुल अग्रवाल, धीरज जाधव, हर्षल कोतकर, श्रेयस सोनपूरकर, मनोज पाटील यांचे सहकार्य लाभले.