पाचोरा ग्रामीण रुग्णालयास शिवसैनिकांनी ठोकले कुलुप

0

पाचोरा। पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा गैरहजर राहुन खाजगी व्यवसाय करतात. दवाखान्यातील कर्मचार्‍यांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने कर्मचारीही आनेक वेळा दांडी मारुन खाजगी कामे करतात. अशा अनेक समस्या व गलधान कारभारामुळे रुग्ण हैराण झाल्याने येथील शिवसेनेचे शहर अध्यक्ष किशोर बारावकर यांचे नैतृत्वाखाली सायंकाळी 7.30 वा. कुलुप ठोकण्यात आले.

वैद्यकिय सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा
येथील सेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाच्याप्रती आमदार किशोर पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी जळगाव यांना देवुन निवेदनात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बाहेरुन औषधी आणण्यास सांगितले जाते. याशिवाय बाळंतपणासाठी आलेल्या स्रियांना सरळ बाळंतपण न करता सिजर करण्याचा सल्ला देवुन रुग्णालयात सेवा देत असलेल्या डाक्टरांच्या खाजगी रुग्णालयात सिजरसाठी पाठाविण्यात येते. विषबाधा झालेल्या रुग्णानां सेवा न देता ताबडतोब जळगाव येथे पाठविण्यात येते. यामुळे गोरगरीब रुग्णांच्या खिशाला झड पडत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी ग्रामीण रुग्णालयास कुलुप ठोकले.

यावेळी यांची होती उपस्थिती
यानंतर ही वैद्यकिय सेवा सुरळीत न मिळाल्यास आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा ही यावेळी दिला. यानंतर तहसिलदार बी.ए.कापसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिकेत सुर्यवंशी, आशिष आमृतकर, दिपक पाटील, कुणाल सोनार, जितेंद्र पेढांरकर, व्यंकट राजपुत, विशाल साठे, योगेश पाथरवट, संदिप राणे, विजय भोईसह सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थितीतीत होते.