पाचोरा । पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एस.सी.(अनुसुचित जाती) प्रवर्गासाठी राखीव होती. नगरपालिका निवडणूक नोव्हेंबर 2016 मध्ये घेण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे संजय गोहिल हे निवडुन आले. गोहील हे मुळचे गुजरात राज्यातील रहिवासी असल्याने व त्यांच्याकडे 1950 च्या अगोदरचा महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचा पुरावा नसल्याने त्यांच्या पदाला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय अहिरे यांनी जळगाव न्यायालयात आवाहन दिले आहे.
निवडणुकीनंतर राजपत्रात सहा महिन्याच्या आत जात- पडताळणी समितीकडून जातप्रमाणपत्र पुरावे देऊन सादर करावे लागतात. परंतु आजतागायत त्यांनी पुरावे सादर केले नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगराध्यक्षपदावरुन गोहील जाणार की राहणार यावरुन पाचोरा शहरात तर्क विर्तक सुरु आहे. दरम्यान तक्रारदार अहिरे हे गोहील अपात्र ठरतील यावर ठाम आहेत. गोहील अपात्र ठरल्यास पोचार्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे.