पाचोरा न.पा.चे पाण्याचे नियोजन बिघडले

0

पाचोरा । पाचोरा नगरपालिकेचा गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा योजनाचा बोजवारा उडाला आहे. नियोजन शुन्य कारभारामुळे शहरवासीयांना सुलतानी संकटाला सामोरे जावे लागले असून पाण्याचे नियोजन पाण्यात गेल्याने काँग्रेस आय ने आंदोलन चा इशारा दिला आहे. पाचोरा नगर परिषद नागरिकां कडुन पाणी पुरवठा करण्यासाठी 365 दिवसाचे जवळपास 1500 रुपये आकारणी करत आहे. परंतु वर्षे भरात केवळ 100 दिवस देखील सरासरीने पाणी पुरवठा होत आहे तर सद्यस्थितीत महीण्याला केवळ तिन दिवस पाणी पुरवठा होत असतांना या योजनेकडे बघायला स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणविणार्‍या मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्यासह या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना कुठलेच सोयरसुतक नाही. प्रत्यक्ष काँग्रेस आयचे आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेतल्यानंतर मुख्याधिकारी देशमुख यांनी पाणी पुरवठा योजना नगर परिषदेला परवडत नाही असे उत्तर दिले.

सुरळीत पाणी पुरवठासाठी मागणी
यावर श्री सोमवंशी यांनी नागरिक आपल्या सुविधा उपलब्ध व्हावे, म्हणून विविध कर नगर परिषदेच्या माध्यमातून भरणा करतात नगर परिषद 365 दिवस पाणी पुरवठा करू या आश्वासनांच्या आधारे 1500 रुपये म्हणजे च दिवसाला 5 रुपये आकारणी होते मात्र प्रत्यक्षात 75 दिवस पाणी पुरवठा होतो त्यामुळे हि अकारणी 80ते 90 रुपये पडत असुन प्रत्येक नळधारकास इतर टॅकंर द्वारा वर्ष भर 20 ते 25 हजार रुपयांचा भुर्दंड केवळ पाणी केटी व्येअर मध्ये असुन न. पा. च्या नियोजन शुन्य कारभारामुळे मिळत नाही. 48 तास एस्कप्रेस फिडर बंद असतांना न. पा. अधिकारी वर्गाने लक्ष न दिल्याने पुन्हा 10 दिवसाआड पाणी पुरवठा पुन्हा झाला आहे. संबंधीत मुख्याधिकारी यांनी तात्काळ पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत न केल्यास काँग्रेस आयचे अनोखे आंदोलन करेल असा इशारा आरोग्य सेल चे जिल्हा अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिला आहे. त्यातच शहरातील लाखो रुपयांचा फिल्टर प्लांट हा शोपिस बनल्या ने शहरात नागरिकांना पोटाचे आजार सुरू झाले आहे याकडे देखिल लक्ष नगर परिषद ने द्यायला पाहिजे अशी मागणी केली आहे.