पाचोरा : 19 जून शिवसेना वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे संस्थापक हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांच्या जन सामान्यांच्या कार्याला व शिवसेनेला अभिमान वाटेल असा पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन या दोन्ही तालुक्यातील नेत्र रुग्णांचे सेवेचे व्रत हाती घेऊन मतदार संघ मोती बिंदु मुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. ही संकल्पना पुढे नेण्यासाठी 1 जुन रोजी भडगाव रोडवरील अल्पबचत भवनाच्या कार्यालयात मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी तालुका आरोग्य विभागाचे डॉ. समाधान वाघ व पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, सेविका, सर्व कर्मचार्यांची बैठक आयोजित केलेली होती.
या बैठकीत मोतीबिंदु मुक्त मतदार संघ अभियानाबाबत मार्गदर्शन करतांना आमदार किशोर पाटील यांनी सुचना करतांना सांगितले की, येत्या 8 जूनपर्यंत दोन्ही तालुक्यांतील मोती बिंदु रुग्णांची माहिती जमा करून शिवतीर्थ शिवसेना कार्यालय, पाचोरा येथे रुग्णांची यादी जमा करावी. 19 जूनपासून 25 रुग्णांची एक टिम जळगाव येथील कांताई नेत्रालयात तपासणीसाठी शिवसेनेच्या खर्चाने तसेच या रुग्णांची नेण्या व आणण्यासह चहा,पाणी व जेवणाची सोय मोफत करण्यात येणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ पाचोरा-भडगाव मतदार संघातील मोतीबिंदु असणार्या रुग्णांनी घेऊन मतदार संघ मोतीबिंदु मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.