पाचोरा ( प्रतिनिधि ) श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने *इतिहास विभागाच्या* वतीने १९४२ ची छोडो भारत चळवळ आणि भारतातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब खालील देशमुख उपस्थित होते दादासाहेब खालील देशमुख यांनीही भारतीय स्वातंत्र्य लढा आणि क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील उपप्राचार्य जे.व्हि. पाटील डॉ.जे. डी. गोपाळ प्रा.डॉ के. एस. इंगळे प्रा डॉ एस. बी. तडवी प्रा वाय. बी. पुरी प्रा राजेश वळवी ,डॉ क्रांती सोनवणे, प्रा सुवर्णा पाटील, प्रा.प्रदीप रुद्र्सवाड, प्रा.नितीन पाटील आदी उपस्थित होते प्रास्ताविक डॉ जे. डी. गोपाळ यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रंचालान प्रा.डॉ माणिक पाटील यांनी केले तर आभार एस. बी. तडवी यांनी मानले.