पाचोरा । येथे नुकतीच छात्रभारती सदस्य नोंदणी करण्यात आली. या सदस्य नोंदणीचे उद्घाटन छात्रभारती महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता ढगे यांच्याहस्ते करण्यात आले. छात्रभारतीच्या टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीत, वैयक्तिक व सामूहिक संवाद साधून सदस्य नोंदणी करण्यात आली. या छात्रभारतीच्या सदस्य नोंदणीसाठी भूषण महाजन, संदीप जाधव, विवेक पाटील, सचिन इंगळे, संघमित्र लोंढे, राहुल परदेशी, सिमा शिरसाठ, ज्योती पाटील, प्रियंका मोरे, सागर क्षिरसागर, सोमनाथ चौधरी यांनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे छात्रभारती सदस्य नोंदणीचा समारोप करण्यात आला.