पाचोरा शहरातील बंद घर फोडले

पाचोरा : शहरातील गिरणा पपिंग रोडवरील बंद घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी ६८ हजार २०० रुपये किंमतीचे दागिणे लांबविले. ही घटना बुधवार,१४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
पाचोरा शहरातील गिरणा पपिंग रोडवरील साई पार्क येथे संदीप उत्तम परदेशी यांच्या मालकीचे घर आहे. या घरात एका खाजगी बॅंकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले पंकज एकनाथ चौधरी हे गेल्या दिड वर्षांपासुन भाडेतत्त्वावर वास्तव्यास असुन ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या मुळगावी शिंदखेडा, ता. धुळे येथे परिवारासह गेले होते. दरम्यान आज १४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शेजारी यांना घराचा दरवाजा उघडा दिसला असता शेजाऱ्यांनी पंकज चौधरी यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती जाणुन घेतली असता पंकज हे परिवारासह गावीच असल्याचे निष्पन्न झाल्याने घरात चोरी झाल्याचा संशय बळावला. पंकज चौधरी हे तात्काळ घरी दाखल होवुन शहानिशा केली असता घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे टोंगल, ५ ग्रॅम वजनाचे काॅप व ३ ग्रॅम वजनाच्या बाह्या, ७ ग्रॅम वजनाचे पॅडल पोत, २ ग्रॅम वजनाची अंगठी, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व १ हजार रुपये किंमतीची तीन भार वजनाची चांदीची अंगठी असा एकुण ६८ हजार २०० रुपये किंमतीच्या सोन्या- चांदीच्या दागिणे चोरीस गेल्याचे उघड झाले. या प्रकरणी पंकज चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र शिंदे हे करीत आहे