पाचोरा शहरात पत्रकार संघ व पालिकेतर्फे वृक्षरोपण

0

पाचोरा । आखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पाचोरा व नगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने भडगाव रोड परिसरातील जयराम कॉलनीतील हनुमान मंदिराच्या जागेत तहसीलदार बी.ए. कापसे व पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, न.पा.उपनगराध्यक्ष शरद पाटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कॉलनीतील जेष्ठ नागरिक पी.जी. चौधरी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, तालुकाध्यक्ष विनायक दिवटे, श्यामकांत सराफ, मिलिंद सोनवणे, विजय पाटील, प्रशांत येवले, नंदकुमार शेलकर आदीसह विलास पाटील, न.पा. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी किरण बाविस्कर, प्रकाश गोसावी, नयन सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.