पाचोरा । शहरातील आदर्श नगरातील रहिवासी अशोक लिंडायत छोटासा परिवार त्यांचा मुलगा चि. कुणाल बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्तेचा पाचोरा शहरातील नामवंत गो.से. हायस्कुल मध्ये या वर्षी इयत्ता 9 वीच्या वर्गातून उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. कुणालच्या अंगी उच्च शिक्षणाची ओढ व जिज्ञासा असल्याने आय.आय.टी. क्षेत्रात प्रगती करावी अशी मनापासून त्याची तळमळ होती. मात्र वडीलांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पुढील शिक्षणाचा यक्ष प्रश्न उभा राहिला. अशावेळी अशोक लिंडायत यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची तातडीने त्यांनी त्यांचे मित्र आर.आर.पाटील व गणेश पाटील यांच्या माध्यमाने किशोर पाटील यांची भेट घेतली. मुलाच्या पुढील शिक्षणाची व्यथा मांडली. सामाजिक बांधिलकी जोपासरणार्या आप्पासाहेबांनी क्षणात त्यांना आश्वासित करत मुलाला दत्तक घेवून त्याचे आयटीआयचे शिक्षण पुर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
एक लाखपर्यंत फिची घेतली हमी : एक लाखापर्यंतची प्रवेशासाठी लागणारी फीची हमी घेतली. कुणाल हा आयआयटी क्षेत्रात आपले करियर कोटत्त (राजस्थान) येथे करणार आहे. मुलाच्या स्वप्नपुर्तीसाठी करीत असलेली धडपड हि खरच मनापासून वाखण्यासारखी आहे. आमदार किशोर पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गुणवंत विद्यार्थी कुणाल यांस दत्तक घेतले असून, त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. त्याचे वडील अशोक लिंडायत यांचा आनंद गगनात माहवत नव्हता. किशोर पाटील यांच्या ठिकाणी असलेल्या उदारता गुणामुळे सर्वत्र अभिनंदाचा वर्षाव होत आहे.