पाचोर्‍यातील दोघांच्या जाचामुळे शेतकर्‍याची विष प्राशनाने आत्महत्या

In Bhusawal, a woman was molested and beaten up by a family at the point of a sword: a case against two including Vishnu Pathroad भुसावळ : शहरातील भारत नगर भागात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करून महिलेचा विनयभंग करीत महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना भारत नगरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात राहुल पाटील व विष्णू पथरोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीचा विनयभंगाचा आरोप
भुसावळात भारत नगरात मंगळवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास संशयीत राहुल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, 32 खोली, भुसावळ) यांनी हातात तलवार बाळगत एका घरात प्रवेश केला. यावेळी महिलेचा हात धरून विनयभंग करण्यात आला तर तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली व जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पाटील व विष्णू पथरोड विरूध्द आर्म अ‍ॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहे.