पाचोर्‍याचे नगराध्यक्ष संजय गोहिल अपात्र घोषित

0

जातीचे वैधता प्रमाणपत्र वेळेत न सादर केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी केले शिक्कामोर्तब
पाचोरा – पाचोरा येथील नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम 1965 चे कलम 51 (1)ब या नियमानुसार जातीचे वैधता प्रमाणपत्र एका वर्षाचे आत निवडणूक विभागाकडे सादर केले नसल्याचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अजय अहीरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. त्यावर 23 रोजी अंतिम सुनावणी होऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संजय गोहिल यांना अपात्र घोषित केले आहे, यानंतर गोहिल यांना अपील दाखल करण्यासाठी 15 दिवसाची मुदत असल्याशे ते राज्याचे नगरविकास मंत्री ना.रणजीत पाटील यांचेकडे ठाण मांडून असल्याचे खात्रीलायकवृत्त असुन प्रतिस्पर्धी उमेदवार अजय अहीरे यांनीही कॅव्हेट दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

पाचोरा येथील नगरपरीषदेची निवडून 27 नोव्हेंबर 2016 रोजी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणुक या पध्दतीने झाली होती. निवडणूकीत शिवसेतर्फे संजय गोहिल, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजय अहिरे तर शहर विकास आघाडीतर्फे अ‍ॅड. अविनाश भालेराव यांनी निवडणूक लढविली होती. यात संजय गोहिल यांनी अजय अहिरे यांचा सुमारे 2200 मतांनी पराभव केला होता. दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल हे मुळचे गुजरात येथील रहिवासी असल्याने त्यांचेकडे सन 1950 पुर्वीचा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसल्याचा परावा नसतांना जात पडताळणी विभागाने त्याचे जात प्रमाणपत्र पत्र वैद्य ठरविले होते दरम्यान अहीरे यांनी औरंगाबाद खंडपीठात वैद्य प्रमाण पत्राला चॉलेंज केले होते, मात्र सप्टेंबर 2018 मधे शासनाने अध्यादेश जारी करून जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची मुदत सहा महीन्या ऐवजी एक वर्षाची केली तरीही संजय गोहिल यांचे वैधता प्रमाणपत्र सादर न झाल्याने अहीरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल केले होते त्यावर 23 रोजी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संजय गोहिल यांना अपात्र घोषित केले आहे. गोहिल यांना नगर विकास मंत्र्यांकडे 15 दिवसांचे आत अपिल सादर करण्याची मुदत असल्याने अपिल दाखल केल्यानंतर नगरविकास मंत्री रणजीत देशमुख काय निकाल देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.