पाचोर्‍यातील मयताच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत

0

पाचोरा । पंतप्रधान जिवन ज्योती विमा योजने अंतर्गत दि पाचोरा पिपल्स को-ऑफ बँक ली. मध्ये खातेदार असलेल्या मयत अजय स्वरूपचंद गौंड यांच्या कुटुंबाला विमा योजनेचा दोन लाख रूपयांचा धनादेश चेअरमन अशोक संघवी यांच्या हस्ते देण्यात आला. बँकेत खाते असलेल्या नागरीकांना त्यांचा कमी रक्कमेत विमा काढण्याची पंतप्रधान जिवन ज्यौती वीमा योजना संपुर्ण भारतभर सुरू आहे. शहरातील अजय स्वरूपचंद गौंड यांचे चार महीन्यांपुर्वीच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिंवर अघात झाला होता. त्यांचे दि पाचोरा पिपल्स को-ऑफ बँक ली. मध्ये बचत खाते होते व त्यांनी सदर योजनेचे वार्षीक 342 रूपयांचा भरणाही केलेला होता.

योजनेचा पाठपुरावा करून केली मदत
चेअरमन अशोक संघवी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांना सुचना देऊन या विमा योजनेचा पाठपुरावा केला. या योजनेतुन गौंड कुटुंबीयांच्या वारसास दोन लाख रूपयांची मदत बँकेला उपलब्ध झाली. सदरची रक्कम त्यांची पत्नी राधिका अजय गौंड यांना दिली. यावेळी व्हा. चेअरमन राजमल अग्रवाल, संचालक अ‍ॅड. अविनाश भालेराव, प्रा. भागवत महालपुरे, चंद्रकांत लोढाया, जिवन जैन, प्रकाश पाटिल, अमोल शिंदे, कल्पना पाटिल, किशोर शिरूडे, अशोक बाफणा, बँक कर्मचारी चंद्रकांत घोडके, पी.डी. पाटील, आर.एस. पाटील, रेहमान तडवी व जगन चव्हाण उपस्थित होते. पाचोरा शहरातील बँक खातेदारांना या योजनेचा लाभ मिळऊन देणारी पाचोरा पिपल्स बँक ही एकमेव बँक आहे. दि पाचोरा पिपल्स बँकेच्या सभासद व ग्राहकांनी पंतप्रधान जिवन ज्यौती विमा योजनेचा जास्तीत ज्यास्त लाभ घ्यावा, असे अवाहन चेअरमन अशोक संघवी यांनी केले आहे. बँकेच्या मुख्य शाखेत चंद्रशेखर वर्मा हे या योजनेचे काम पाहात आहे.