पाचोरा । येथील देशमुखवाडी भागातील दुमजली इमारत कोसळली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र शहरातील उभ्या असलेल्या जुन्या इमारतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे? आज शनिवार 15 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता पाचोरा येथील देशमुखवाडी भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागील महाराष्ट्र सह.फळ विक्री सोसायटी लि.पाचोरा ही दोन मजली धोकादायक इमारत कोसळली.
सुदैवाने या इमारतीत कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली. मात्र शहरात अशा अनेक इमारती असून त्या इमारतीमध्ये रहिवाशी राहत आहे. मात्र त्या इमारती धोकादायक ठरत असून पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.