शिवसेना शहरप्रमुखांची गटशिक्षणाधिकार्यांकडे तक्रार
पाचोरा– शहरातील संभाजी नगर जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळेत गुरूवारी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात किडे निघाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा व पोषण आहार वाटप करणार्या यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी पाचोरा शहर शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे शहरप्रमुख मतीन अ.रज्जाक बागवान यांनी पाचोर्यातील गटशिक्षणाधिकार्यांकडे लेखी पत्रकान्वये केली आहे.