कारवाई केल्याचा राग ; पोलिसात गुन्हा दाखल
पाचोरा- वाळू माफियावर प्रांताधिकार्यांनी कारवाई केल्याचा राग आल्याने वाळू माफियानेच दहशत निर्माण करण्यासाठी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या बंगल्यावर दगडफेक करून शिवराळ भाषेत शिवीगाळ केल्याने त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नरेंद्र उर्फ पिंटू पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दिड महिन्यांपूर्वी प्रांताधिकार्यांनी आरोपीवर वाळू संदर्भात कारवाई करीत नोटीस बजावली होती. हा राग मनात धरून आरोपीने शनिवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ कृष्णाजी नगरात राहणार्या प्रांताधिकार्यांच्या बंगल्यावर दगडफेक केली.