पाचोर्‍यात मांडूळाची तस्करी : दोघांना अटक

0

पाचोरा- शहरात मांडूळ विक्रीसाठी दोन जण येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यावरून सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. अजय साहेबराव पाटील (27, खडकदेवळा) व मनोज ज्ञानेश्‍वर वढदे (28, कुर्‍हाकाकोडा) अशी अटकेती आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा सारोळा रोडवरील आयटीआयजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मांडूळ खरेदीसाठी कोण येणार होते? याबाबत माहिती कळू शकली नाही. मांडूळ बाळगळल्याने गुप्तधन प्राप्त होते, असा समज असल्याने लाखो रुपयात मांडूळाचा सौदा केला जातो. वनविभागाचे वनक्षेत्रपाल ज्ञानेश्‍वर देसाई, वनपाल काळे यांनी ही कारवाई केली.