भुसावळ- पाचोरा रेल्वे स्टेशनवर विशेष पथकाने बुधवारी राबवलेल्या तपासणी मोहिमेत 323 केसेसच्या माध्यमातून एक लाख 47265 रुपयांचा दंड वसुल केला. ही मोहिम सहायक वाणिज्य प्रबधंक (कोचिंग) श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली तर या मोहिमेमुळे फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
तपासणी मोहिमेमुळे खळबळ
33 तिकीट निरीक्षक व सात रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी असलेल्या पथकाने बुधवारी सकाळी आठ वाजेपासून धडक मोहिम सुरू करीत विना तिकीट करणार्या 131 प्रवाशांकडून 57 हजार 675 रुपयांचा दंड तसेच आरक्षित डब्यातून आरक्षण नसताना प्रवास करणार्या 190 प्रवाशांकडून 89 हजार 320 रुपये तसेच सामानाचे बुकींग नसताना वाहतूक करणार्या दोन प्रवाशांकडून 270 रुपये दंड वसुल करण्यात आला. विशेष मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफ वी.के.भंगाळे, वाय.डी.पाठक, विवेन रॉड्रिक्स, प्रशांत ठाकूर, एस.ए.दहिभाते, उमेश कलोसे, एस.पी.मालपुरे, पी.एम.पाटील, आर.पी.सरोदे, एल.आर.स्वामी, ए.के.गुप्ता, ए.एम.खान, अनिल खर्चे, अजय बच्छाव, निलेश पवार, ए.एस.राजपूत, निलेश पवार, जी.एस.शुक्ला, शेख अल्ताफ, आल्विन गायकवाड, बी.एस. महाजन आदी सहभागी झाले.