पाच कोटींच्या कामांना आमदारांनी दिली स्थगिती दिली : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आरोप
खडसे उवाच : स्पर्धा करायची असेल तर विकास कामांसाठी स्पर्धा करावी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मंजूर केलेले पाच कोटींच्या विकासकामांच्या कामांना आमदारांनी आडकाठी आणत स्थगिती दिली असून स्पर्धाच करायची असेल तर विकासकामांची स्पर्धा करा, असा आरोप माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कुर्हा येथील मुस्लिम समाजासाठीच्या शाही शादीखाना हॉलच्या लोकार्पणप्रसंगी केला. मुक्ताईनगर तालुक्यात राज्यातील पहिले अल्पसंख्यांक कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होत असून उपसा सिंचन योजनेच्या कामांनादेखील वेग आला आहे.
100 कोटींची कामे आणून दाखवावी
पावसाळ्यात इस्लामपूर धरणात पाणी पडले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असून 1500 हेक्टर शेत जमीन त्यामुळे ओलिताखाली येणार आहे. कुंड धरणासाठी 33 कोटी रुपये मंजूर केले असून येत्या 4 तारखेला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आभासी संवादाद्वारे त्याचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत खडसे म्हणाले की, कुणी डाकू म्हणो कुणी चोर म्हनो पण नाथाभाऊवर 40 वर्ष जनतेने प्रेम केले आहे हीच वस्तुस्थिती आहे. 20 हजार कोटींची कामे मी जिल्ह्यात आणून दाखवली. आमदारांनी साधे 100 कोटींची कामे आणून दाखवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
स्पर्धा ही विकासाची करावी
तुम्ही सेनेचे आमदार नसून अपक्ष आहेत अजितदादांनी देखील ने सांगितले आहे. ज्या राष्ट्रवादीच्या बळावर तुम्ही निवडून आले त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप करत 50 वर्ष आमदार राहायचे असेल तर स्पर्धा ही विकासाची असावी विकास कामांना स्थगिती आणणारी नसावी, असाही आरोप या प्रसंगी खडसे यांनी केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, उपसभापती सुवर्णा साळुंखे, जि.प.सदस्या वैशाली तायडे, वनिता गवळे, सरपंच सुनीता मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, जि.प.चे माजी सदस्य सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा रंजना कांडेलकर, राष्ट्रवादी प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल खोले, माजी सभापती दशरथ कांडेलकर, युवक तालुकाध्यक्ष राजेश ढोले, विलास धायडे, राजु माळी, विकास पाटील, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस रविंद्र दांडगे, माजी सरपंच डॉ.बी.सी.महाजन, ओमप्रकाश चौधरी, राजु खंडेलवाल, शिवा पाटील, रणजीत गोयंका, गजानन पाटील, पवन पाटील, रमेश खंडेलवाल, पुरुषोत्तम पाटील, डॉ.गजानन खिरळकर, प्रदीप पुरी गोसावी, नरसिंग चव्हाण, वसंता पाटील, भागवत भोलणकार, कचरू बढे, गोपाळ पाटील, गणेश विटे, संतोष कांडेलकर, माणिक पाटील, विष्णू झालटे, शकिर जमादार, समसोद्दीन बाबा, मयुर साठे, भैय्या कांडेलकर, सुशील भुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
युकाँ शहराध्यक्षपदी सोनू मिस्त्री
यावेळी पवन दिनकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गट प्रमुख पदी तर सोनु इरफान मिस्त्री यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सूत्रसंचालन मयूर साठे तर प्रास्ताविक डॉ.बी.सी.महाजन यांनी तर आभार रंजीत गोयंका यांनी मानले.