पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

0

मुंबई । अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तिर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशिम जिल्ह्यातील श्रीसंत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करतांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण यांचा समावेश करावा. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्या आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने या तीर्थक्षेत्राचंया विकास आराखड्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरी देण्यासाठी शिखर समितीची बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ना. सुधीर मनुगंटीवार, ना. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. बच्चू कडू, आ. अमित झनक आदी प्रधान सचिव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र
वाशिम जिल्ह्यातील लोणी येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी वीस कोटींच्या आराखड्यास आज शिखर समितीने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 10 कोटी 15 लाखांची कामे करण्यात येणार आहेत. या आराखड्यानुसार मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर वीजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी आदी कामे तसेच गावातील इतर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर सुशोभित महाद्वार बांधण्यात येईल.

श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ विकास आराखडा
अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 6 कोटी 69 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह/सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्रॉक्रिटीकरण आदींचा समावेश आहे.

श्री क्षेत्र रिद्धपूर विकास आराखडा
अमरावतील जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर हे महानुभव पंथांची काशी म्हणून ओळखली जाते. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छता गृह, थिम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावित थिम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटींगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश राहणार आहे.

श्री क्षेत्र जोतीबा विकास आराखडा
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील श्री क्षेत्र जोतीबा देवस्थान विकास आराखड्याच्या 25 कोटी रुपयांच्या कामानाही यावेळी शिखर समितीने मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार सेंट्रल प्लाझा परिसराचा नुतनीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील विद्युत पुरवठा भूमिगत करणे, यात्रेकरुसाठी भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व पर्जन्य जल पुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. भक्त निवासामध्ये कुटुंबांसाठी 22 खोल्याव3मोठेहॉलबांधण्यातयेणारआहेत. आठ ते दहा हजार क्षमतेचे दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सेंट्रल प्लाझा येथे म्पिथिएटर प्रमाणेच व्यवस्था करण्यात येणार असून तेथे साहित्य विक्री दुकानेही असणार आहेत.