Robbery Plan Foiled in Bhusawal : Gang Of Five In The Net भुसावळ : बाजारपेठ पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य चाकू, कुर्हाड, दोर व मिरची पावडर असे जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये सुरज अशोकराव भांगे (25, रा.पापा नगर, इराणी वाडा, भुसावळ), कलीम शेख सलीम शेख (32, रा.दिनदयाल नगर भुसावळ), समीर शहा उर्फ डमरु जब्बार शहा (20, रा.दिनदयाल नगर, भुसावळ), गिरीष गोकुलसिंग जोहरी (20, रा.दिनदयाल नगर, भुसावळ), विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण (22, रा.सोनिच्छा वाडी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना धक्काबुक्की करीत आणला अडथहा
शुक्रवार, 19 रोजी रात्री 12.05 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणा नगरच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर काही संशयीत दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर गस्तीवरील पोलिस पोहोचल्यानंतर संशयीतांना हटकले असता आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करीत कामात अडथळा आणा. आरोपींविरोधात भादंवि 399, 353, 401, 402 प्रमाणे बाजारपेठ पोलिसात हवालदार विजय नेरकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्ये निरीक्षक सुदर्शन वाघमारे पुढील तपास करीत आहेत.