पाच दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर-जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रय़त्न हाणून पाडला आहे. येथील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा सुरक्षारक्षकांनी खात्मा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी भारतीय हद्दीत शिरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांचा प्रय़त्न हाणून पाडला. सुरक्षारक्षकांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला, प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात चार दहशतवा्यांचा खात्मा झाला. परीसरात शोधमोहीम अद्याप सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रमजान महिन्यात शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तिसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. शनिवारीही बांदीपोरा येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलादरम्यान चकमक झाली होती.