पाच लाखांसाठी विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांना शिक्षा

0

जळगाव । वरणगाव येथील विवाहितेला चारचाकी वाहनासाठी 5 लाख रूपये माहेरहून आणावी यासाठी तिचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी वरणगाव पोलिसात पती, सासू, दिर व ननंद व नंदोई यांच्या विरोधात विवाहितेच्या छळप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले असून दीर सोडून इतरांना सहा महिन्याची शिक्षा व 2 हजार रूपये दंड अशी शिक्षा न्यायाधिश्यांनी ठोठावण्यात आली आहे.

सहा महिन्याची शिक्षा आणि दोन हजार रूपयांचा दंड
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील विवाहितेचा आश्‍विन गौतम वाघ रा. वरणगाव यांच्याशी विवाह झाला होता. चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावे यासाठी तिचा मानसिक, शारिरीक छळकरून त्रास देण्यास सुरूवात केली. आपला छळ होत असल्याची तक्रारी विवाहितेने तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती आश्‍विन गौतम वाघ, सासू उषाबाई गौतम वाघ, दीर रूपेश गौतम वाघ, ननंद मनिषा भिमराव बिर्‍हाडे, भिमराव डिगंबर बिर्‍हाडे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज झालेल्या न्यायालयीन कामकाजात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार दीर रूपेश वाघ याला निर्दोष सुटका करण्यात आली असून इतर चौघांविरोधात 498, 323, 504, 506, 34 प्रमाणे सहा महिन्याची शिक्षा आणि दोन हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.आर.पी.गावीत यांनी कामकाज पाहिले.

दोन वेगवेगळ्या घटनेत चार जखमी
जळगाव । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ दोघेजण मोटारसायलकने जात असतांना मोटारसायकल घसरल्याने दोघे जखमी झाले असून दोघांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रवि पाटील (वय-32) आणि श्रावण आढाव (वय-34) दोन्हा रा. चौघुले प्लॉट जवळ हे मोटारसायकलने सिंधी कॉलनीकडून शहराकडे जात असतांना पंचमुखी हनुमान मंदीराजवळ मोटारसायकल घसरून जखमी झाले. दोघांना जवळील जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर दुसर्‍या घटनेत, पाळधी पोलिस चौकीजवळी मनियार प्लास्ट इंडस्ट्रिजजवळ एक ट्रालाने मोटारसायलकने मनिलाल पावरा (वय-25) आणि प्रकाश पावरा (वय-30) दोन्ही राहणार अमळनेर हे अमळनेरकडे जात असतांना ट्रालाने धडक दिल्याने दोन्हा जखमी झाले. दोघांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.