पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ ; चाळीसगाव पोलिसात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा !

As the demand of five lakhs was not fulfilled, the married woman was beaten and tortured: A case was registered against six people of Shendurni चाळीसगाव : चाळीसगाव येथील माहेर व शेंदूर्णी येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सोन्याचे दागिणे हिसकावले : मारहाणीचा आरोप
शाहिनाबी महेमूद शेख (30, रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती शेख महेमूद शेख नूरा, जेठ कलीम शेख नूरा, शेख शकील नुरा, जेठानी मुमताज शेख शफी, शेख जवराहारून, सासू खैरुनिसा शेख नुरा (सर्व रा.शेदुर्णी, ता. जामनेर) यांनी माहेरुन पाच लाख रुपये प्लॉट घेण्यासाठी माहेरून आणण्याची मागणी केली तसेच मागणी पूर्ण न झाल्याने शिवीगाळ करुन मारहाण करून अंगावरुन सोन्याचे दागिने काढून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कॉन्स्टेबल भगवान उमाळे हे करीत आहेत.