पाच लाख रुपये न आणल्याने शिरसोलीच्या विवाहितेचा छळ
जळगाव एमआयडीसी पोलिसात पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांकडून छळ केला. या प्रकरणी शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पतीसह जळगाव एमआयडीसी पोलिसात सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
रीता अनिकेत पवार (28, रा. तुलसी विहार पनवेलकर, रॉयल कोर्स, बदलापूर मुंबई, ह.मु.म्हसावद, ता.जळगाव) यांचा विवाह अनिकेत नितीन पवार (रा. बदलापूर, मुंबई) यांच्याशी रीरतीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अनिकेत पवार यांनी पत्नी रीता पवारने घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत म्हणून छळ सुरू केला. यासाठी सासू लताबाई नितीन पवार यांनीदेखील मुलाचे कान भरवून विवाहिता रीता पवार यांचा छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्यात.
पतीसह सासुविरोधात गुन्हा दाखल
सासरचा छळ असह्य झाल्याने विवाहितेने जळगाव एमआयडीसी पोलिसात शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पती अनिकेत नितीन पवार आणि सासू लताबाई नितीन पवार यांच्याविरोधात शारीरिक छळ व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.