पाच हजार रुपयांची पुस्तके देण्यात आली भेट

0

भुसावळ। येथील जळगाव रोड भागातील स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या सहाव्या पुण्यस्मरणार्थ अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पाच हजारांची स्पर्धा परिक्षांची पुस्तके जागर बुक बँकेला भेट देण्यात आली. गेल्या महिन्यापूर्वी जागर बुक बँक साकारण्यात आली आहे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासनात येवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील उभी करण्याचा मानस आहे.त्यासाठी आवश्यक विविध स्पर्धा परिक्षांची पुस्तके भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती
संस्थेने केलेल्या आवाहनानुसार अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे जागर बुक बँकेला पाच हजारांची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील, जागरचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, प्रा.शाम दुसाने, प्रा.निवृत्ती पाटील, प्रा.निलेश गुरूचल, प्रा.ऋषीकेश पवार, डॉ.जगदीश पाटील, अ‍ॅड.हरेश पाटील, विनोद पाठक, रामराव मुरकुटे, प्रदिप चौधरी, श्रीराम सपकाळे, यश पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.