पाटीबेडकी येथे काँग्रेस ब्लॉककमेटी फलक अनावरण

0

नवापूर । तालुक्यातील पाटीबेडकी या गावात कॉग्रेस ब्लाँक कमेटीचे फलक अनावरण नवापुर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते झाले या प्रसंगी नवापूर तालुका कॉग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष आर.सी.गावीत.पाटीबेडकीचे जेष्ठ कॉग्रेसचे कार्यकर्ते रतिलाल गावीत,अ‍ॅड बाळु गावीत,ग्रा.प सदस्य जितेंद्र गावीत,स्वनिल गावीत,गोविद गावीत,गांगु गावीत,कल्पेश गावीत,इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

कमेटी अध्यक्षपदी खुशबु गावीत
पाटीबेडकी या गावातील ब्लाँक कमेटी अध्यक्षा खुशबु गावीत,उपाध्यक्ष सिंग्या गावीत,सचिव रंजित गावीत,सदस्य म्हणुन राजु गावीत,दिलीप गावीत,,सुदाम गावीत,रोत्या गावीत,निर्मला गावीत,गिता गावीत, कृष्णा गावीत, भामटी गावीत,भिल्या गावीत,रिना गावीत,यशोदा गावीत,देविदास गावीत,अनुबाई गावीत, विमलबाई गावीत,सल्लागार म्हणुन अ‍ॅड बाळु गावीत याची निवड करण्यात आली आहे.

तालुक्याचा सर्वांगिण विकास
भरत गावीत यांनी सांगितले की, नवापुर तालुक्यामधे आ.सुरुपसिंग नाईक,माजी मंत्री माणिकराव गावीत यांनी तालुक्यात पक्षाचे मजबुत संघटन करतानाच जिल्हयाचा विशेष करुन नवापुर तालुक्याचा सर्वागिण विकास केला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी धरणे बांधुन शेतीला पाणी दिले. तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात बागायत शेती करुन चांगले उत्पन्न मिळवत आहे. सुत्रसंचालन व आभार अ‍ॅड.बाळु गावीत यांनी मानले.