अमळनेर । अमळनेर आगारातून फक्त सकाळीच 9.30 वाजता सुटणारी बस 16 जानेवारी रोजी अमळनेर येथे एसटी आगार वाहतूक नियंत्रकास मारहाण केल्या प्रकरणी एसटी कामगार संघटनांनी अचानक बंद पुकारल्याने तब्बल दोन तास उशीरा आली व खाली फिरून गेली तर दिनांक 17 रोजीची सकाळची एकमेव असलेली बस आलीच नसल्याने विद्यार्थी व पालकांकडून तीव्र नाराजीकडे व्यक्त केली असून शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थीनी वर व महिला प्रवाशांना लहान बालकांना कडेवर घेऊन 3ते4 किमी अंतरावर पायपीट करत गेल्या दोन दिवसांपासून शाळा गाठावी लागत आहे. तर काहिंना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला. अचानक केलेल्या बस वाहतूक बंदमुळे प्रवाशांसह विद्यार्थांचे ही हाल झाले. दुपारी बस खाली आली व प्रवासी न थांबल्याने रिकामीच फिरून गेली. तर काल बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बसची वाट प्रवासी पाहत बसले परंतु बस आलीच नाही.