पाडळेतील दारू विक्रेत्याच्या खूनप्रकरणी तिघा आरोपींना अटक

0

रावेर : गावठी दारूच्या भट्टीवर झालेल्या वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होवून एकावर कुर्‍हाडीसह धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने मुराद तुराब तडवी (रा.पाडळे बुद्रूक) या इसमाचा खून झाल्याची घटना बुधवारी पाडळे शेतशिवारात बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून गावठी दारु विक्रेत्यांच्या आपसातील वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

भांडण बेतले जीवावर
संशयीत रशीद तडवी, रईस तडवी, हुसेन तडवीसह 10 ते 12 जणांनी मुराद तडवी यांच्या डोक्यावर व छातीवर विळा, कुर्‍हाडीने वार केले तर मृताचा लहान भाऊ सुलेमान तडवी (25) आणि वडील तुराब जहांबाज तडवी (60) हे देखील भांडणात जखमी झाले. खून प्रकरणी रावेर पोलिसांनी रशीद शौकत तडवी, हुसेन रशीद तडवी, रईस रशीद तडवी यांना ताब्यात घेतले आहे.