आगामी निवडणुकीत मनसे ताकदीनिशी लढणार -मयुरी पाटील
भुसावळ- आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीनिशी लढणार असून मनसे निश्चितच विजयी होणार असल्याचा आशावाद नूतन महिला जिल्हाध्यक्ष मयुरी पाटील यांनी वर्तवला. रावेर तालुक्यातील पाडळे खुर्द येथील 200 महिलांनी मनसे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मयुरी पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यातील राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय झाली असून आगामी निवडणुकीत मनसे आगळी-वेगळी छाप पाडणार आहे. पक्षाची विचारधारा नागरीकांपर्यंयत पोहचविण्याचे कार्य सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसेच्या शाखा स्थापन करुन 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाच्या माध्यमातून नागरीकांना सेवा देण्यासाठी कार्य केले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
पाडळे खुर्दच्या महिलांचा मनसेत प्रवेश
महिला जिल्हाध्यक्ष मयुरी पाटील यांच्यासह मनसे पक्षावर विश्वास ठेवून रावेर तालुक्यातील पाडळे खुर्द गावातील 200 महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. मनसेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीबांना लाभ मिळवून देण्याचे उपक्रम राबविणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष मयुरी पाटील म्हणाल्या. प्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप राजपूत, तालुका उपाध्यक्ष अरुण चौधरी, भुसावळ गण अध्यक्ष दशरथ सपकाळे, अनंत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.