पाणी, कचर्‍यावरून आयुक्तांसमोरच वाद

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या एसपीव्ही कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अचानक स्थायी समिती सभापती सीमा सावळे व विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यात जोरदार वादावादी झाली. बोलाविली होती. आयुक्तांनी शहरात पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची सरकारी भाषेत दिली. त्यामुळे बहल यांनी संतप्त होत महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून पाणीटंचाईसह कचरा समस्या गंभीर झाली आहे. गेल्या सात महिन्यांत सत्ताधार्‍यांसह प्रशासनाकडून काहीच ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा थेट आरोप केला. केवळ आकडेवारी आणि तांत्रिक माहिती देऊन समाधान करू नका, असे म्हणत त्यांनी आयुक्तांवरही टीका केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस काळातील जुन्या मुजोर ठेकेदारांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रत्युत्तर सावळे यांनी दिले.

बहल यांनी विषय छेडल्यावर सावळे म्हणाल्या, सर्व ठेकेदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील असल्याने ते मुजोर झाले आहेत. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणार्या 67 विविध बेरोजगार संस्थांचे ठेकेदार नीट काम तर करीतच नाहीत. त्यांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार केवळ 8 ठेकेदारांची नियुक्ती करण्याचे नियोजन सुरू आहे. यावर बहल म्हणाले, दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यास तुम्हाला कोणी अडवले आहे? कारवाई करा; मात्र पाणीटंचाई आणि कचरा समस्या सोडावा, असे थेट आव्हान दिले. यावर मध्यस्थी करीत हर्डीकर म्हणाले की, विविध उपाययोजना करून शहरात पाणीपुरवठा नियमित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कचरा संकलन कामाची नव्या धोरणानुसार निविदा प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे.